Socio Politics
Hindu Mahasabha
स्वर्गीय मदन मोहन मालवीयजी आणि १९१५ च्या कुंभमेळ्यातील साधूसंत यांच्या चर्चेतून एक हिंदूसाठी राजकीय पक्ष असावा असे ठरले आणि हिंदू महासभेची निर्मिती झाली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वात फाळणी काळातील अराजकतेमध्ये हिंदू महासभेने केलेले हिंदू संरक्षणाचे कार्य आजही आपल्या स्मरणात आहे.
“आमच्या साठी हिंदुत्व म्हणजे राजकीय स्वार्थ नाही तर नैतिक जबाबदारी आहे.”
हिंदु महासंघाच्या माध्यमातून सुरू झालेले काम आणि पुणे परिसरातून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्रात राज्यात पसरला आणि आता तो देश पातळीवर आपला ठसा उमटवत आहे.
हिंदूच्या आत्मसन्मानाचे प्रतीक जपणे, हिंदुत्वाचे कार्य म्हणजेच हिंदूंचे कार्य. हिंदूंचे रोजचे जीवन सुखकर करणे, त्याला दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा सहजरित्या उपलब्ध करून देणे (वाहतूक, पाणी, रस्ते, बागा) म्हणजेच सुद्धा हिंदुत्व.
छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासाच्या कार्यशाळा शाळांमध्ये जाऊन घेतल्या.
विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर संविधानिक पद्धतीने प्रश्न मांडले आणि सोडवले.
युवकांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र उभारले.
गेल्या 78 वर्षात हिंदूंना मिळाले ते फक्त आश्वासनें आणि फसवणूक हिंदु महासभा म्हणून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर नुसते बोलणार नाही तर कृती करू
राजकीय व्यभिचार आणि भ्रष्टाचाराने राजकीय नेत्यांचा कंटाळा आला आहे. तेच चेहरे, तीच आश्वासने, तीच निष्क्रियता नको आहे त्यासाठी तर एकच चांगला पर्याय—
हिंदू महासभा…
हिंदू महासभेच्या परिवारात सक्रिय होण्यासाठी आजच संपर्क करा!
आनंद दवे- +९१ ९८२२१ ७६६६४
Bramhan Mahasangha
2019 सालच्या 8 ऑक्टोबरला ब्राह्मण महासंघाची स्थापना झाली. जातीचे काम न करता धर्माचे काम करायचे या संकल्पनेवरती एक आक्रमक संघटन उभे राहावे या विचारांनी प्रेरित ब्राह्मण महासंघ नेहमी काम करतो. आरक्षण हे जातीनिहाय असू नये तर ते आर्थिक निकषांवर असावे याबाबत ब्राह्मण महासंघ आग्रही आहे. विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर कधी कायदेशीर मार्गाने तर कधी आंदोलने करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडायचे काम ब्राह्मण महासंघ करतो त्याचप्रमाणे महासंघाची महिला आघाडी देखील विविध आक्रमक आंदोलने करते. कोणत्याही प्रकारची सभासद फी न घेता हे संघटन काम करत आहे. अल्पावधीतच स्वतःचे शैक्षणिक संस्था औद्योगिक आघाडी दोन पतसंस्था या माध्यमातून देखील समाजहिताचे काम साधण्याचे शिवधनुष्य संघटनेने पेलले आहे.

DESi
ज्ञानगंगा एज्युकेशनल आणि सोशल इन्स्टिट्यूट ही ब्राह्मण महासंघाची शैक्षणिक क्षेत्रातील संलग्न संस्था. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर्जेदार व्यावसायिक शिक्षण देणे यासाठी कटिबद्ध आहे. या संस्थेतर्फे विविध प्रकारचे स्किल कोर्सेस, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अशा वैविध्यपूर्ण शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाह्य केले जाते MKCL ची मान्यताप्राप्त असलेले तसेच अठरा देशविदेशातील विद्यापीठांची संलग्न असलेली ही संस्था शैक्षणिक कार्यात भरीव काम करते आहे. वैदिक गणित सारखे विषय ऑनलाइन स्वरूपात शिकवणे, परदेशी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्याबाबत मार्गदर्शन करणे, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबर पालकांना देखील समुपदेशन करणे असे विविध उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात.

महालक्ष्मी नागरी महिला पतसंस्था

मैत्रेयी महिला नागरी पतसंस्था
ब्राह्मण महासंघाच्या महिला संचालित दोन पतसंस्था आहेत महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मैत्रेयी महिला नागरी पतसंस्था अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे या दोन्ही पतसंस्था या महिला संचालित आहेत मैत्रेयी पतसंस्थेला उत्तम पतसंस्थेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे दोन्ही पतसंस्थेतर्फे लघुउद्योजक महिला उद्योजक यांना लघु व मध्यम स्वरूपात व्यावसायिक कर्ज उपलब्ध केले जाते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध केले जाते. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून व्यावसायिकतेला हातभार लावता यावा यासाठी छोट्या छोट्या बचत गट स्थापन करून एका बाजूला बचतीची सवय आणि दुसऱ्या बाजूला कर्ज उपलब्ध करून देते. दोन्ही पतसंस्थांचे व्यवहार हे पारदर्शक तर आहेच पण घरपोच सेवा आणि बचतीवर चांगले व्याजदर ही यांची खासियत आहे

Maitreyee Event's
विविध प्रकारची प्रदर्शने भरवताना ग्राहकहीतासोबत लघु उद्योजकांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. प्रदर्शन भरवताना माफक दर उत्तम सुविधा आणि भरपूर जाहिरात यावर भर दिला जातो. प्रदर्शन मध्ये भाग घेतल्यावर स्वतःचा ब्रँड निर्माण व्हायला उद्योजकांना मदत होते आणि त्यांचा व्यवसाय वाढीस लागल्याचे अनेक जण नमूद करतात

BiTO
ब्राह्मण महासंघाचे व्यावसायिक आघाडी असलेली बिटो ही संस्था व्यावसायिक घडवण्यामध्ये भरीव कामगिरी करत आहे. तरुण पिढीने नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक व्हावे यासाठी सर्वतोपरी मदत केली जाते. विविध मान्यवर या संस्थेचे डायरेक्टर आहेत आणि ते व्यावसायिक प्रगतीसाठी मार्गदर्शनास उपलब्ध असतात. बीटोतर्फे व्यवसाय वाढीसाठी लागणारे भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जाते तसेच परदेशापर्यंत त्यांच्या पसरलेल्या नेटवर्कचा फायदा मेंबर्सला करून दिला जातो अशा प्रकारे बिटो फक्त व्यवसाय वाढवत नाही तर व्यावसायिकता घडवते बीटोच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यवसाय वाढण्यास अनेकांना मदत झाली आहे खूप थोड्या कालावधीमध्ये बिटोही संस्था व्यावसायिकांच्या पसंतीस उतरली आहे




